1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (15:53 IST)

बाप्परे, ९ वर्षाच्या मुलावर तब्बल १५ कुत्र्यांनी केला हल्ला

A 9-year-old boy
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये अवघ्या ९ वर्षांच्या अनिकेत सोनवणेवर तब्बल १५ कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा एक पाय निकामी झाला आहे. चांदवडच्या दुगावात राहणारा अनिकेत खेळण्यासाठी घराबाहेर गेला. त्यावेळी अचानक कुत्र्यांनी हल्ला केला. यातही तो घाबरला नाही, त्याने जवळच असलेल्या काठीने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे अनिकेत काही करू शकला नाही. सध्या अनिकेतवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.