सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (11:05 IST)

गौतम गंभीर यांचा पलटवार, नेहमीसाठी सोडून देईन जिलेबी खाणे...

दिल्लीमध्ये प्रदूषणावर झालेल्या बैठकीत सामील न झाल्यामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले माजी क्रिकेटर आणि दिल्लीहून भाजप खासदार गौतम गंभीर यांनी म्हटले की माझ्या जिलेबी खाण्यामुळे प्रदूषण वाढत असल्यास मी नेहमीसाठी जिलेबी खाणे सोडून देईन.
 
गंभीर यांनी मीडियाशी चर्चा करताना म्हटले की बैठकीपेक्षा अधिक आवश्यक आहे की काम? मी आपल्या 5 महिन्याच्या कार्यकाळात जेवढे कामं केले तेवढे केजरीवाल सरकारचे 5 वर्षात देखील झाले नाही.
 
त्यांनी प्रश्न केला की केजरीवाल सरकारने प्रदूषणाला सामोरा जाण्यासाठी असे काय खरेदी केले, जेव्हाकि मी 90 कोटीच्या मशीन आणि वाहन खरेदीसह गाजीपुरचं काम देखील सुरू केले.
 
त्यांनी म्हटले की मी कॉन्ट्रॅक्ट केला असल्यामुळे याबाबद सूचना 11 ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती की मी बैठकीत उपलब्ध नसणार. लोकांनी मला 10 मिनिटातच ट्रोल करणे सुरू केले. लोकांनी केजरीवाल सरकारला देखील प्रश्न विचारायला हवे की त्यांनी प्रदूषणासाठी काय केले.