सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (09:38 IST)

विद्यार्थिनीला चॉकलेट देण्यावरून कोल्हापुरात मोठा राडा

कोल्हापूर कृषी महाविद्यालयात घुसून गावगुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयाच्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. चॉकलेट डेच्या दिवशी विद्यार्थिनीला चॉकलेट देण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादावरून कॉलेजबाहेरील काही गावगुंडांनी कॉलेजमध्ये प्रवेश करून विद्यार्थिनीला चॉकलेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्याच्या मित्रांना जबर मारहाण केली.
 
एका विद्यार्थ्यांने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी कॉलेजमध्ये बाहेरच्या तरुणांनी दहशत माजवली. त्यामुळे संतापलेल्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ऑफिस समोरच निदर्शन सुरू केले आहे. यावेळी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्याबरोबर चर्चा करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.