मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (16:55 IST)

पाळीव कुत्र्याच्या ओरडण्याचा वाद, मारहाणीत मालकीणीचा मृत्यू

मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये एका पाळीव कुत्र्याच्या ओरडण्यामुळे मालकिणीचा नाहक बळी गेला आहे. नागम्मा शेट्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाळीव कुत्रा सतत ओरडत असल्याने आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. यावरुन त्या महिलेची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
 
डोंबिवलीमधील मानपाडा रोड येथे एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी यांच्याकडे पाळीव कुत्रा होता. हा कुत्रा सतत ओरडायचा त्यामुळे शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. ‘आम्हाला या कुत्र्याच्या सातत्याने भुंकण्याचा त्रास होतो,’ अशी शेजाऱ्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नागम्मा शेट्टी आणि शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि शेजारी राहणाऱ्या चारही महिलांनी तिला मारहाण केली. या मारहाणीत त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.