सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत पोलिसांना जबर मारहाण, संतप्त जमावाने फोडल्या गाड्या

चेंबूर इथे पोलिसांनाच मारहाण आणि दगडफेक केल्याची बातमी समोर येत आहे. स्थानिकांकडून रास्ता रोको करत पोलिसांना मारहाण तर त्यांच्या गाड्याही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आल्या आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबरला कुर्ला ठक्करबाप्पा इथल्या स्थानिकाने लोकल रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती कारण काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी हरवली होती. तिचा पोलिसांनी शोध न घेतल्याने या व्यक्तीने आत्महत्या केली होती. याचा राग म्हणून आज स्थानिकांनी पोलिसांनाच मारहाण केली.
 
कुर्ला ठक्कर बाप्पा इथल्या सहा महिन्यापूर्वी हरवलेल्या आरती रिठाडीया हिचा तपास लावण्यात कुर्ला नेहरूनगर पोलीस चालढकल करत असल्याने आरतीचे वडील पाचाराम रिठाडीया यांनी १० दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या निशेधार्थ आज कुर्ला नेहरूनगर येथून पाचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक स्थानिक लोक आणि रेगर समाज सहभागी झाला होता. या वेळी मयत पाचाराम कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता.
 
अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्तारोको केला. त्यामुळे अंत्ययात्रेला आलेल्या जमावामध्ये एकच धावपळ उडाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. काही वेळातच सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यावेळी जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली. यावेळी दोन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या जमावाने या पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला चढवला. जमावाने पोलिसांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात हे दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.