PMC बँकेच्या खातेधारकांनी NOTA ला मत
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (PMC) बँकेत पैसे अडकलेल्या खातेधारकांची नाराजी विधानसभा मतदानामध्ये पहायला मिळाली. PMCच्या अनेक खातेधारकांनी मतदान केलं, पण आपलं मत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला न देता NOTA ला दिलं.
शंकर कोटियन, त्यांची पत्नी मंजुला आणि मुलगी अमृताचा यांनी NOTAला मत देऊन आपला राग व्यक्त केला. 50 वर्षीय शंकर हे बॉलिवुडमध्ये स्टंटमॅन होते. पैसे बँकेत अडकल्यामुळं त्यांची चांगलीच आर्थिक ओढाताण होत आहे.
नोटाला पसंती देणाऱ्या इतर खातेधारकांमध्ये 70 वर्षीय क्लिफॉर्ड डिसोझा, विश्वनाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नी नंदा यांचाही समावेश आहे.