रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (16:03 IST)

मतदाना बरोबरच प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती

पुण्यात मतदानासाठी होणाऱ्या गर्दीचा चांगल्या प्रकारे उपयोग करीत महानगरपालिकेने एकदाच वापराच्या प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिम राबवली आहे.
 
पर्यावरणाला हानिकारक असणारे आणि पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रक्रिया होत नसलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत पुणे महानगरपालिकेकडून शहरातील सर्व मतदान केंद्रांवर जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी एक सेल्फी स्पॉट तयार करण्यात आला असून इथे एका हिरव्या रंगाच्या फलकावर “आजपासून मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही” असे निर्धार करणारे वाक्य लिहिले असून त्यासोबत सेल्फी घेण्याचे आवाहन केले जात आहे. याद्वारे ‘मी मतदान केलं, तुम्हीही केलंत का?’ असा प्रश्नही अद्याप मतदान न केलेल्या मतदारांना विचारण्यात आला आहे.
 
यासंदर्भात पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी म्हटले की, “मी सर्वांना जाहीर विनंती करतो त्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी निवडणूक केंद्रावर मतदानासाठी जाऊन त्याठिकाणी मतदानानंतर “आज पासून मी सिंगल युज प्लास्टिक वापरणार नाही” या सेल्फी स्पॉटवर सेल्फी काढून तो आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर पोस्ट करावा.”