शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (08:29 IST)

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद म्हणून पोस्ट व्हायरल

चांदवड तालुक्यातील सैन्य दलातील भरवीर येथील अर्जुन प्रभाकर वाळुंज याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. फाशी घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॅाक्टरांनी त्यास मृत्य घोषीत केले.
 
चांदवड तालुक्यातील व्हाॅटस्अप वर मात्र अर्जुन शहिद झाल्याच्या पोस्ट व्हायरलं होत आहे. 26 सप्टेंबर रोजी त्याने आपल्या पत्नीस दारुच्या नशेत मारहाण केली होती. या व इतर घरगुती ताण तणावातून ही आत्महत्या झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
 
चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन वाळुंज हा सध्या अरुणाचल प्रदेश मध्ये कार्यरत होता. सदर जवान 2010 साली सोल्जर म्हणून अलिबाग मराठा रेजिमेंट मध्ये दाखल झाले होते.