गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (21:56 IST)

बारसूतील लोकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न

eknath shinde devendra fadnavis
बारसूतील लोकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
 
ज्या पद्धतीने महिलांवर पोलिसांनी हल्ले केले आहेत. आंदोलकांना फरफटत मारत पोलिसांच्या गाडीत फेकले जात आहे. आतंकवाद्याशी लढाई लढावी अशापद्धतीने आंदोलकांवर बंदूक्या रोखल्या जात आहेत. ही काही लोकशाही नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, गावातल्या लोकांच्या जमिनी हिंसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे आपल्या जमिनीवर प्रेम असते. जमीन आणि शेती ही त्यांची आई आहे. त्यामुळे कोणाला वाटेल माझी जमीन, माझी शेती अशाप्रकारे विषारी प्रदूषणाच्या विळख्यात जावी आणि आम्ही देशोधडीला लागावे असे कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. पण या राज्याचे उद्योग मंत्री आणि त्यांचे प्रमुख लोक त्यांनी काय नक्की व्यवहार कोणाशी केला आहे, हे रहस्य असल्याचेही ते म्हणाले.
 
मुख्यमंत्री रजेवर
कोकणमध्ये एवढी मोठी आंदोलनाची ठिणगी पडली असताना मुख्यमंत्री कुठे आहेत, उपमुख्यमंत्री काय करत आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्याच्या मुखसहमतीने हा लाठीमार, हल्ले सुरू आहेत का? आणि मुख्यमंत्री नॉटरिचेबल झाले आहेत. कुणीतरी मला सांगितले की, मुख्यमंत्री रजेवर आहेत. या राज्याचा प्रमुख राज्यामध्ये आंदोलन सुरू असताना रजेवर कसा जाऊ शकतो. ही बेफिकीरी आहे आणि ही बेफीकीरी खारघरच्या संदोष मनुष्यवधाच्या बाबतीत घडली तीच बेफीकीरी आता बारसूच्या बाबतीत घडताना दिसते आहे. या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्यांची इच्छा नसेल, त्यांची तयारी नसेल तर त्या जमिनी तुम्हाला हिंसकावून घेता येणार नाहीत.
Edited by : Ratnadeep Ranshoor