सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (13:07 IST)

Sanjay Raut Statement : 15 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य

sanjay raut
Maharashtra Politics:  माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पमुख  उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी  खासदार संजय  राऊतांनी शिंदे -फडणवीस सरकारवर मोठं वक्तव्य केलं आहे. 
 
संजय राऊतांच्या वक्तव्यानुसार येत्या 15 दिवसात शिंदे -फडणवीस सरकारचे डेथ वारंट निघाले असून हे सरकार कोसळणार. संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक जण आपापली मते मांडत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांचं राज्य कोसळणार आहे.या सरकारचे डेथ वारंट निघाले असून येत्या 15 दिवसात हे राज्य कोसळणार असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. त्यांच्या या  वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  
 
संध्याकाळी 6.30 वाजता ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार असून ठाकरे दुपारी 11 वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रवास करतील नंतर वाहनाने पाचोरा पोहोचतील. ते आज उद्योजकांशी चर्चा  करतील. तसेच  निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन करतीलशिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सिड्सचे चेअरमन आर ओ पाटील यांचा 11 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील नंतर संध्याकाळी 6:30 
वाजता जाहीर सभा घेतील.
 
Edited By - Priya Dixit