मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (10:58 IST)

बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, 22 जखमी

accident
कोल्हापूरहून मुंबई जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात होऊन चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले .हा अपघात पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात असताना कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात असताना मालवाहतूक ट्रक चे ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन बसवर जाऊन धडकला.

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातात चार जण जागीच मृत्युमुखी झाले.त्यात दोन  महिला  आणि दोन  पुरुषांचा  समावेश आहे.  रात्री 2:15 च्या सुमारास प्रवासी झोपलेले असताना हा अपघात झाला.या अपघातात 22 जण जखमी झाले आहे . या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने जखमींना रुग्णालयात पाठवले असून त्यांच्यावर उपचार  सुरु आहे.त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. तर या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि इतर प्रवाशांची सुखरूप सुटका केली.  

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतकांची ओळख अद्याप  पटलेली नाही. पोलीस तपास करत  आहे. 
 
Edited By - Priya Dixit