गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (11:29 IST)

कारने दुचाकीला फरफटत नेले, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यात नागपूर-मुंबई महामार्गावर विरोबा मंदिरा समोर एका बोलेरो कारने  दुचाकीला धडक दिली. धडक लागून दुचाकीस्वार काका आणि पुतणीचा दुर्देवी मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की कारने दुचाकीला फरफटत नेले. या मध्ये नारायण कारभारी शेळके आणि पूजा वेणुनाथ शेळके यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

नारायण आपल्या पुतणीसह दुचाकीने जात असताना भरधाव येणाऱ्या बोलेरो कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि दुचाकीला 70 फूट फरफटत नेले .या मुले काका आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.  
 
Edited By- Priya Dixit