गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (08:41 IST)

नाशिक : फेसबुक लाईक ने पाच लाखात गँडावले, उत्तर प्रदेशातील आरोपीस अटक

arrest
फेसबुकवरील एका व्यावसायिक पोस्टला लाईक केल्यानंतर संबंधित व्यक्‍तीने पाठपुरावा करून वेळोवेळी विविध अमिष दाखवून तब्बल पाच लाख 13 हजार 200 रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली आणि पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील आरोपीला ताब्यात घेतले. त्यास कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
याबाबत तक्रारदार सविता अविनाश पवार यांनी 27 सप्टेंबर रोजी 2022 रोजी फसवणूक झाल्याची तक्रार नाशिकच्या सायबर पोलिसांकडे केली होती. त्याचा तपास करीत पोलिसांनी गाझियाबाद येथील नितीश रमेश कुमार (रा. खोडा कॉलनी,गाझियाबाद) यास शिताफीने अटक करून गाझियाबाद कोर्टाचा ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणले तर याच फसवणूक प्रकरणी आणखी एक संशयित राज सोमवीर राघव (रा.शिवपुरी न्यू विजयनगर, गाझियाबाद) हा फसवणूक करणार्‍या कंपनीचा संचालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor