1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (13:10 IST)

अवघ्या १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

Anandacha Shidha will be available for 100 rs only
गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
 
१ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. या पूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळेल. यात १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येईल. आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. 
 
ई-पॉसची व्यवस्था नसले तेथे ऑफलाईन पद्धतीने शिधा दिला जाईल.