शिंदे सरकारने नव्या निर्णयानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले
महापालिकांसह सध्या प्रशासकीय राजवट असलेल्या महापालिकांमध्ये येत्या काळात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सरकारने नव्या निर्णयानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनांवरील खटले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने नव्या प्रभाग रचनांना जैसे थेचे आदेश दिले होते. यामुळे जुन्याच प्रभाग रचनांवर निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात असताना शिंदे सरकारने नव्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाला पालिकेच्या निवडणुका पावसाळ्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. असे झाल्यास येत्या पंधरवड्यात निवडणुका जाहीर होऊ शकतात. परंतू शिंदे सरकारचे आदेश लागू झाले तर यासाठी पुन्हा पाच ते सहा महिने लागू शकतात. या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असणार आहेत. पुढच्या सुनावणीवेळी निकाल येण्याची शक्यता आहे. याबाबतची बातमी एबीपी माझाने दिली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor