1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (08:10 IST)

नाशिक मधील विमानसेवा पाठोपाठ पासपोर्ट सेवा देखील ठप्प

नाशिकमधील विमानसेवेपाठोपाठ पासपोर्ट सेवा देखील ठप्प झाली आहे. सर्वर डाऊन असल्याने पासपोर्ट कार्यालयामधील कामकाज ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बाहेगावाहून पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
अधिक माहितीनुसार, पासपोर्ट कार्यालयाकडून सेवा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती कार्यालय प्रशानसनाने दिली आहे. विमानसेवेपाठोपाठ पासपोर्ट सेवा देखील ठप्प झाल्याने लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
 
नियमित वार्षिक देखभाल दुरुस्तीचा भाग म्हणून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विमानसेवा ठप्प झाली असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु नियोजित कामे पुर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून मिळाली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor