1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (20:46 IST)

सरनाईक यांचा ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला

pratap sainaik
राजकीय विरोधकांकडून ५० खोके घेतल्याचे आरोप होत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ९०० खोके दिले आहेत. पण, ते मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आभारी असल्याची प्रतिक्रीया बाळासाहेबांची शिवसेनेेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळत असल्याचा दावा करत सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १८०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यापैकी ९०० कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी आहे तर, उर्वरित ९०० कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांसाठी आहे. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, असेही सरनाईक यांनी म्हटले आहे. होता. यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे आमदारांनी पत्रे देण्यापुर्वीच मुख्यमंत्री शिंदे हे विकासकामांसाठी निधी देत आहेत, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor