सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (08:38 IST)

संताप झाला, त्याने रागाच्या भरात लाकडी दांड्याने केला पत्नीचा खून

जळगाव यावल तालुक्यातील थोरगव्हाण गावात राहणाऱ्या एकाने संतापाच्या भरात लाकडी दांड्याने मारहाण करीत पत्नीचा खून केला आहे. दरम्यान, घटनेनंतर संशयीत पती स्वतःहून पोलिसात हजर झाला असून कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे समजते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा गावातच एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात प्रकाश पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोन्ही एकटेच होते.
 
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पती-पत्नी यांच्या कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्यानी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी पती प्रकाश पाटील याने खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.