गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:44 IST)

नाशिकच्या अनिकेत झवर या युवकाने 'आयर्न मॅन' होण्याचा बहुमान

नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यानंतर आता हिरावाडी परिसरात राहणाऱ्या अनिकेत झवर या युवकाने 'आयर्न मॅन' होण्याचा बहुमान मिळवल्याने नाशिकचा डंका जर्मनमध्ये वाजला आहे. 29 ऑगस्ट रोजी जर्मन देशातील हॅमबर्ग इथं झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिकच्या अनिकेत झंवरने विजेतेपद पटकावून भारताचा झेंडा जर्मन मध्ये रोवला आहे.

भारतीय वातावरणाच्या पेक्षा तिथल्या प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेत मानाच्या परंतु तितक्याच कठीण समजल्या जाणाऱ्या या आयर्नमॅन स्पर्धा अनिकेत झंवरने 15 तास 50 मिनिटांचा कटऑफ असतांना ही स्पर्धा 14 तास 35 मिनिटात पूर्ण केली आहे.या स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे,180 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 42 किलोमीटर धावणे हे एकाच वेळेस पूर्ण करावं लागतं.जर्मन मध्ये 'आयर्न मॅन' होण्याचा मान मिळवणाऱ्या अनिकेत झंवरचे नुकतेच नाशिक मध्ये आगमन झाले असून त्याचा परिसरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात,फुलांची उधळण करत स्वागत केले आहे.नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात अनिकेतचं जोरदार स्वागत करण्यात आल्याने देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
 
जर्मनी देशात हॅमबर्ग  येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिकच्या आठ खेळाडूंनी सहभाग घेतला  होता. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून सात नाशिककरांनी आयर्नमॅन हा मानाचा किताब पटकावला. शारीरिक व मानसिक कसोटी पहाणार्‍या या स्पर्धेत 3.8 कि.मी. स्विमिंग,180 कि.मी. सायकलिंग  व 42 कि.मी. रनिंग हे सर्व पूर्ण करण्यासाठी 15 तास 50  मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.नाशिकचे

निलेश झवर यांनी 11:59:21
डॉ.देविका पाटील 13:03:00
नीता नारंग 13:25:30
डॉ.वैभव पाटील14:26:34
अनिकेत झवर 14:35:55
अरुण पालवे 15:04:34 डॉ.अरुण गचाले 15:37:37

अशा वेळेत पूर्ण करून आयर्न मॅन हा मानाचा किताब पटकावला
डॉ. सुभाष पवार यांनी वयाच्या 64 व्या वर्षी आयर्न मॅन या  खडतर स्पर्धेत सहभागी होण्याचे साहस केले. स्विमिंग व सायकलिंग निर्धारित वेळेत पूर्ण केले,पण रनिंग त्यांनी कट ऑफ वेळेत पूर्ण झाले नाही ,तरी पण जिद्द सोडली नाही, उशीर झाला तरी ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. डॉ. सुभाष पवार यांनी यापूर्वी टायगर मॅन हा किताब वेळेत पूर्ण केलेला आहे.

डॉ. देविका पाटील या फास्टेस्ट इंडियन आयर्नमॅन लेडी ठरल्या. यापूर्वी रविजा सिंगल यांनी आशिया खंडातील यंगेस्ट आयर्नमॅन लेडी चा मान पटकावला डॉ. अरुण गचाले यांनी दुसऱ्यांदा आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे.
 ही स्पर्धा पूर्ण करताना अनेक हवामानाच्या बदलांचा सामना करावा लागला,अंधारातच स्विमिंग चालू झाले त्यामुळे मार्ग समजणे कठीण होते .शिवाय थंडगार पाणी,सायकलिंग करतांना हवेचा सामना करावा लागला .रनिंग करताना पाऊस चालू होता

जिद्द व चिकाटी या बळावर ही स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे सर व सायकलिस्टस च्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडिया द्वारे सुरु आहे तसेच नाशिक रनर्स चे अध्यक्ष श्री. नारायण वाघ सर व सर्व धावपटूंचे लक्ष या स्पर्धेकडे लागून होते .मध्यरात्रीपर्यंत सर्वांनी जागे राहुन अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.या सर्व स्पर्धकांना नाशिकचे माजी पोलीस आयुक्त आयर्नमॅन श्री रवींद्रकुमार सिंगल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.