बेळगाव महापालिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हातून गेली

Last Modified सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (12:45 IST)
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट पाहायला मिळतेय.समितीला अवघ्या चार जागांवर यश मिळताना दिसत आहे,तर भाजप पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेली असून देखील जवळपास 30 जागांवर भाजपला बहुमत मिळण्याच्या मार्गावर आहे.
बेळगाव महापालिका निवडणूक आजवर भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली गेली होती.मात्र यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्ष या निवडणुकीत आपापल्या चिन्हांवर रिंगणात उतरले होते.

भाजपनं सर्व 58 जागांवर उमेदवार उभे केले होते;तर महाराष्ट्र एकीकरण समितीने 23,काँग्रेसने 39 आणि आपने 24 जागांवर उमेदवार दिले होते.शिवाय एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.
मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप यांच्यातच चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाल्याचं चित्र आहे.

राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने साम-दाम-दंड-भेद अशा गोष्टींचा पुरेपूर वापर झाल्याची चर्चा बेळगावमध्ये आहे. काही वर्षांचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिकेवर कायम महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. यंदा मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला भाजपनं जोरदार दणका दिल्याचं चित्र आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

‘वर्क फ्रॉम होम’करण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा, कामाचे ...

‘वर्क फ्रॉम होम’करण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा, कामाचे तास निश्चित करणे आणि वीज आणि इंटरनेटचे पैसे भरणे यावर भर देणार
केंद्र सरकार ‘वर्क फ्रॉम होम’बाबत सर्वसमावेशक कायदा करण्याच्या तयारीत आहे. नवीन ...

सरकार एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे

सरकार एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वजनामुळे होणार्‍या समस्या लक्षात घेता सरकार त्यांचे वजन कमी ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा प्रयत्न !
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दोन खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांवर 17 मुलींचे ...

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक
वाढदिवसाचा केक चाकूऐवजी तलवारीने कापण्याची क्रेझ तरुणांना वाढत आहे. पण हा शौक बर्थडे बॉय ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत असाल तर 31 डिसेंबरपर्यंत हे ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत  असाल तर  31 डिसेंबरपर्यंत हे काम करा, नाहीतर होईल नुकसान
गेल्या वर्षी जेव्हा PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा तो तरुणांमध्ये ...