1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (09:39 IST)

मामालाच गंडवले, भाच्याने मित्रांच्या मदतीने 50 तोळे दागिने केले लंपास, गाठली मुंबई

nephew
सध्याच्या जीवनशैलीला बळी पडलेले तरुण मौजमस्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकता याचं एक उदाहरण म्हणजे एका अल्पवयीन मुलानं आपल्या मामाच्या घरातील तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.
 
मुंबई, पुण्यात जाऊन हौसमौज करण्यासाठी या अल्पवयीन आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं मामाच्या घरातून तब्बल 50 तोळे दागिने चोरले आणि नंतर हे दागिने सातही जणांनी आपसात वाटून घेतले. या मुलांना मुंबई आणि पुण्यात जाऊन मौज मजा केल्याची बातमी समोर येत आहे. . याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
 
आरोपीचे मामा हे पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असून त्याचं घर बीडमध्ये पंचशीलनगरात आहे. शिक्षणासाठी भाजा मामाकडे राहत होता. व्यवसाय पुण्यात असल्यामुळे मामा कुटुंबासह पुण्यात राहतात. इकडे काही खोल्या भाड्याने दिलेल्या असून काही स्वत:च्या वापरासाठी ठेवलेल्या आहेत. त्यातील कपाटात तब्बल 50 तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. दरम्यान भाच्याकडे समवयस्क मित्रांचं येण-जाणं वाढलं होतं. यातूनच घरातील सोनं चोरून हौसमौज करण्याची भन्नाट कल्पना मित्रांना सुचली. म्हणून त्यांनी दागिने चोरुन आपसात वाटून घेतले आणि चार मित्र तेथेच राहिले तर तीन अचानक गायब झाल्याने प्रकरण समोर आलं.
 
1 ते 4 सप्टेंबरदरम्यान तिघांनी आपले शौक पूर्ण केले तर तिघे गायब झाल्यामुळे नातेवाईकांची चौकशी सुरु केली गेली तेव्हा भाज्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली ज्यात कोणला किती तोळे दागिने वाटप केले याचा तपशिल आढळला. त्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला.
 
आता चौकशीत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यातील एका आरोपीनं 65 हजारांचा महागडा मोबाइल फोन खरेदी केला. तर दुसऱ्यानं 14 तोळे सोनं एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून लोन घेतलं. तर एकाने 10 तोळं सोनं एका सराफाला अवघ्या दीड लाखात विकलं होतं. या गुन्ह्यातील सातही आरोपी अल्पवयीन असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.