गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:06 IST)

भुजबळ काका पुतण्याची सत्र न्यायालयात धाव

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोष मुक्तीसाठी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. काका पुतण्याच्या या याचिकेवर मुंबईच्या सत्र न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवत विकास चमणकर यांच्या कुटूंबातील चौघांसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात एसीबीवर बेजबाबदारपणे गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवला आहे.
 
छगन भुजबळ यांनी सुरूवातीपासूनच महाराष्ट्र सदन प्रकरणात बिनबुडाचे आरोप लावल्याचा दावा केला होता. या प्रकरणातच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मोठा काळ या कारागृहात घालवला होता. या प्रकरणात छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. त्यानंतर सध्या छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.