रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:13 IST)

बापरे, नाशकात चक्क नाल्यांची चोरी

या आधी वेगवेगळ्या गोष्टी चोरीला गेल्याच आपण पाहिलं असेल परंतु नाशिकात एक अजबगजब प्रकार समोर आलाय नाशिक मध्ये चक्क शेकडो नाले चोरीला गेल्याच समोर येत आहे.
 
या संधर्भात महापालिकेने यामधील जवळजवळ ६३ नाले शोधल्याची माहिती मिळतेय. परंतु राहिलेले नाले कुठं गेलेत? ते कधी सापडतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचा विषय चर्चेत आहे. व या मधीलच अनेक नाले नाहीसे करून त्यावर इमारती उभारल्या आहे. तर काही ठिकाणी बुजवाबुजविचे कारस्थान देखील चालू असल्याचं समजतंय.
 
या नाल्यांची महापालिकेच्या 2017 मध्ये केलेल्या शहर विकास आराखड्यात नोंद आहे. त्यामुळे प्रशासन उशिरा का होईना जागे झाले असून, सध्या ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत 63 पैकी 22 नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.इतकाच नव्हे तर महापालिकेचे राजीव गांधी भवनच हे देखील नाल्यावर बांधले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेसमोर तळे साचते.