रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:07 IST)

धरणातील पाणीसाठा वाढला, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५८ टक्के पाऊस

जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या २ ते ३ दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झालीय. गेल्या आठवडाभरात धरणातील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
 
यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. परंतु राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली जळगाव जिल्ह्यात मात्र, पावसाने चांगलीच ओढ दिल्याचे दिसून आलेय. जून-जुलैत पावसाने ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये दमदार पाऊस कोसळेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला.
 
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तर धरणातील पाणीसाठयात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी जलसाठा झाला आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची जाणवेल असा अंदाज भुगर्भतज्ञ व्यक्त करीत आहेत.
 
जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा असा
धरण–२६ ऑगस्ट २०२१– १ सप्टेंबर २०२१ -गतवर्षीचा साठा (२०२०)
हतनूर–३५.०६–४१.३७ –३९ टक्के
गिरणा–४४.५९–४५.९३–७६
वाघूर–६१.८१–६२.६६–९९.३०
अभोरा–१००–१००–१००
मंगरूळ-१००–१००–१००
सुकी–९२.८९—९५.०७–१००
मोर–५५.४०–५६३–७२.५९
अग्नावती–११.२०–५८.२९—१००
हिवरा–५०.०९—-१००–१००
बहुळा–२०.१३–२७.७५—९४.४४
तोंडापूर–४४.७७–४६.७२–१००
अंजनी–२९.०३–३७.५४–८३.७३
भोकरबारी–१३.४०–१३.२६–९६.५८
गुळ–२९.५९–३१.२०–७७.१४
बोरी–१००–१००–९६.५८
मन्याड–१००–१००–१००
 
एकूण—८१.६५–८८.६२–९९.९७