गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:33 IST)

अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला, सकी धरण ओव्हरफ्लो

The water problem of many villages was solved
जळगावमधील रावेर तालुक्यातील अनेक गावाची जीवन वाहिनी व शेतक-यासाठी महत्वपूर्ण असलेले सुखी नदी वरील गारबर्डी धरण पूर्णपणे भरले आहे. रात्री मध्यप्रदेश व सातपुडा परिसरसतील दमदार पाऊस झाल्याने बहुप्रतीक्षित गारबर्डी धरण भरेल व ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे.धरणाच्या खालील क्षेत्रात यामुळे पाणी आले असून या परिसरसतील शेतक-यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. फैजपुर शहरास येथून पाणी पुरवठा होतो, तर चिनवाल कुंभारखेडा,लोहारा,सावखेडा,आदि गावा साठी देखील हे महत्वपूर्ण आहे,
 
धरण ओव्हर फली होऊन नदिस पाणी आल्याने यापरिसरात शेतीस फायदा होणार आहे विहरी व कुपनालिका यांची खालावालेली पाणी पातळी सुधारण्यास मदत होणार आहे, ऐन पोळया चे सणा वर धरण भरल्याने शेतक-यांचा आनंद द्वगुणीत झाला आहे.