शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (14:15 IST)

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुललं

बेळगाव महालिकेचा निकाल घोषित झाला असून त्यात कमळ ने आघाडी घेत भाजपला यश मिळाले असून महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे.
 
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट पाहायला मिळाली .निवडणुकीत समितीला अवघ्या चार जागांवर यश मिळाले होते,तर भाजप पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेली असून देखील जवळपास 35 जागांवर भाजपला बहुमत मिळाले आहे.
 
बेळगाव महापालिका निवडणूक आजवर भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली गेली होती.मात्र यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्ष या निवडणुकीत आपापल्या चिन्हांवर रिंगणात उतरले होते.
 
भाजपनं सर्व 58 जागांवर उमेदवार उभे केले होते;तर महाराष्ट्र एकीकरण समितीने 23,काँग्रेसने 39 आणि आपने 24 जागांवर उमेदवार दिले होते.शिवाय एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.
 
मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप यांच्यातच चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळाली आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाले.
 
राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने साम-दाम-दंड-भेद अशा गोष्टींचा पुरेपूर वापर झाल्याची चर्चा बेळगावमध्ये आहे. काही वर्षांचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिकेवर कायम महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. यंदा मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला भाजपनं जोरदार दणका देऊन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.