1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (22:55 IST)

अनिल देशमुख यांचा जामीन न्यायालयाने पुन्हा फेटाळला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांनी मुंबईतील विशेष न्यायालयाकडे आपला जामीन अर्ज दिला होता. तो जामीन अर्ज पुन्हा मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अनिल देहमुख यांचा जामिनाच्या अर्जाबाबत न्यायधीश आर.एन.रोकडे यांनी निर्णय दिला.
 
अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाला विशेष एमएलए कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. त्यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी जामीन अर्ज दिला होता या अर्जाला न्यायालयाने फेटाळले आहेत.