शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:06 IST)

एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू, कुठल्याही ई पासची गरज नाही

मागील ५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती. ती २० ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय घेतला असून एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात लोकांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी हा निर्णय घेतला. एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 
 
काही नियम पाळून प्रवास करता येईल, एका एसटीत २२ जण प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांनी याची काळजी घ्यावी. जशी मागणी येईल तशा बसेस वाढवल्या जातील. एसटीचे दर पूर्वीप्रमाणे राहतील त्यात कोणतेही बदल होणार नाहीत ही महत्वाची माहिती देखील परब यांनी यावेळी दिली.