1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (14:05 IST)

थेट निर्णय ही अजितदादांची स्टाईल....!

Direct decision
माझ्या मतदारसंघात असलेल्या आणि इतर प्रश्नांबाबत अजितदादांना (Ajit Pawar) भेटलो. उपस्थित केलेले प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेणं ही दादांची स्टाईल आहे. ती मला भावते, या प्रश्नांवरही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काम करण्याच्या शैलीचं रोहित पवार यांनी कौतुक केलं आहे.  रोहित पवार यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातली ही पहिलीच भेट होती.

रोहित पवार(Rohit Pawar) यांनी त्यांच्या ट्विटरवर अजित पवारांसोबत घेतलेल्या भेटीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीचं कौतुकही केलं आहे.