गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 24 जून 2020 (21:32 IST)

अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडिन्सचे टि्वट व्हायरल

गेली  तीन वर्षे डब्ल्यूडब्ल्यूइमध्ये अंडरटेकरने आपल्या चाहत्यांवर जादू केली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी  चाहते उत्सुक असायचे. तीस वर्षांनंतर आता त्याने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने एक टि्वट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे.
 
मुंबई इंडियन्सने त्याला सलाम ठोकत हे टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये रोहित शर्मा दाखवण्यात आला आहे आणि त्याच्याकडे अंडरटेकरसारखा बेल्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेल्ट रोहितने दोन्ही हाताने उंचावलेला पाहायला मिळत आहे. 
 
एक काळ असा होता की, अंडरटेकर या नावाचे प्रचंड वलय होते. डब्ल्यूडब्ल्यूइ ही कुस्ती सुरु झाली की, सर्वांनाच अंडरटेकरला पाहण्याची इच्छा व्हायची. गेली तीस वर्षे त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तो जेव्हा रिंगमध्ये जाण्यासाठी तयार  व्हायचा, तेव्हा सर्व लाईट्‌स बंद करण्यात यायच्या.सुरुवातीला त्याच्याबरोबर एक कलश घेऊन व्यक्ती यायची. या डेडमॅनच्या अस्थी या कलशामध्ये आहेत, अशी त्यावेळी अफवाही पसरली होती. डब्ल्यूडब्ल्यूइमधील अंडरटेकरची एंट्री ही भन्नाट असायची. सर्व लाइट्‌स बंद असताना तो यायचा. काळे कपडे त्याने परिधान केलेले असायचे, त्याचबरोबर काळी हॅटही तो वापरायचा. त्याची एंट्री एवढी भीतीदाक होती की, त्यावेळी बरीच लहान मुले घाबरायची. त्याचे डोळे पाहण्यासाठीही बरेच चाहते उत्सुक असायचे. 
 
कालांतराने अंडरटेकरबरोबर कलश घेऊन असलेली व्यक्ती नाहीशी झाली. त्यानंतर काही दिवसांनी केन हा अंडरटेकरचा भाऊ असल्याचे चाहत्यांना समजले आणि चाहत्यांनी त्याला रिंगमध्ये पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. 
 
केन हा तोंडाला एक वेगळेच  मास्क लावून यायचा. केन आणि अंडरटेकर यांच्यातील लढत चांगलीच रंगायची. कारण या लढतीमध्ये बरीच नाट्यही पाहायला मिळायची.