शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (22:05 IST)

नोव्हाक जोकोव्हिचला कोरोनाचा संसर्ग, पत्नीचीही चाचणी पॉझिटिव्ह

टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 'बेलग्रेडमध्ये दाखल झाल्या झाल्या आम्ही कोरोनाची चाचणी केली. माझी आणि पत्नी जेलेनाच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे.
 
सुदैवाने, आमच्या मुलांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आहे. पुढचे 14 दिवस मी विलगीकरणात राहीन. पाच दिवसानंतर पुन्हा चाचणीला सामोरा जाईन', असं जोकोविचने म्हटलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी जोकोव्हिचने एका मैत्रीपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसंच सगळे नियम पाळूनच या स्पर्धेचं आयोजन केलं होतं असं जोकोविचने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जोकोविचला कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत.
 
जोकोविचच्या आधी ग्रिगोर दिमित्रोव, बोरना कोरिक आणि व्हिकट ट्रोइस्क यांनाही एड्रिया टूरनंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
 
ब्रिटनच्या डॅन इव्हान्सनं म्हटलं आहे, की जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने स्पर्धेचं आयोजन करताना जबाबदारीचं भान ठेवायला हवं होतं.
 
जोकोविचच्या नावावर 17 ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत.