रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: साओ पाउलो , बुधवार, 10 जून 2020 (11:41 IST)

ब्राझील महिला विश्वचषक यजमानपदाच्या शर्यतीतून बाहेर

आगामी 2023 मध्ये होणार्‍या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून ब्राझील देश बाजूला झाला आहे. कारण कोरोना महामारीमुळे ब्राझील फिफाला आवश्यक आर्थिक आश्वासन देण्याच्या
स्थितीत नाही.

ब्राझील फुटबॉल परिसंघाने याबरोबरच जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्राझील यजमानपदाच्या  दावेदारीसाठी कोलंबियाला समर्थन देईल. यजमानपदाच्या शर्यतीत जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देशही आहेत.