बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2020 (20:21 IST)

मुलापेक्षा छोट्या तरुणाला डेट करत आहे स्टार फुटबॉलर नेमारची आई

ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार ज्युनिअर नेहमी चर्चेत असतो. पण यावेळी तो चर्चेत असण्यामागचे कारण त्याची आई नादीन गोनकाल्विस आहे. नेमारची 52 वर्षीय आई नादीन गोनकाल्विस सध्या एका 22 वर्षाच्या तरुणाला डेट करत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा तरुण नेमारपेक्षा सहा वर्ष छोटा आहे. नादीन यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

नादीन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या   फोटोमध्ये नादीन आपला बॉयफ्रेंड टियागा रामोससोबत बागेत उभी आहे. फोटोत दोघेही एकमेकांची गळाभेटघेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी  कॅप्शन दिली आहे की, हे व्यक्त केले जाऊ शकत नाही. तुम्ही हे जगत असता. यानंतर त्यांनी एक हार्ट इमोजीदेखील दिली आहे.

नादीन यांची भेट होण्याच्या आधीपासूनच टियागो नेमारचा खूप मोठा चाहता होता. आपण 2017 मध्ये त्याच्यासाठी एक संदेश पाठवला होता, असे तो सांगतो. नेमार तू जबरदस्त आहेस, मला कळत नाही, तुझ्यासारख्या व्यक्तीचा चाहता होण्याची भावना शब्दात कशी मांडावी.

मी तुझ्यापासून खूप प्रेरणा घेतो.  आशा आहे एक दिवस हा संदेश मी तुझ्यासोबत वाचेन. पुढे त्याने म्हटले होते की, मला माहिती आहे एक दिवस मी तुला नक्की भेटणार. कारण मी एक ड्रीम बॉय आहे जो कधीच आपले लक्ष्य सोडत नाही.

नादीन यांनी लग्नाच्या 25 वर्षानंतर 2016 मध्ये नेमारच्या  वडिलांपासून घटस्फोट घेतला होता. महत्वाचे म्हणजे नादीन आणि टियागो यांच्या वयात 30 वर्षांचे अंतर असतानाही नेमारने त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला आहे. नेमारने आपल्या आईच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे की, आनंदी राहा आई, लव्ह यू. इतकेच नाही तर नेमारचे वडील रिबेरो यांनीही नादीनला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.