सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रोम , शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (15:44 IST)

वडिलांच्या पाठोपाठ कोरोनामुळे ऑलिम्पिकपटूचा मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन आठवड्यात क्रीडा क्षेत्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इटलीत एका ऑलिम्पिकपटूचा मृत्यू झाला. इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 56 वर्षांचे होते.

धक्कादायक  म्हणजे काही दिवसांपूर्वी दोनातो यांच्या वडिलांचे कोरोनामुळेच निधन झाले होते. दोनातो यांनी 1984च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये 5 वे तर 1988  च्या सोल ऑलिम्पिक स्पर्धेत सातवे स्थान मिळवले होते.