बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2019 (09:36 IST)

मेस्सीचे विक्रमी 600 पूर्ण

फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने बुधवारी चॅम्पियन लिगच्या सेमिफायनलमध्ये लिव्हरपूलविरुद्ध खेळताना इतिहास रचला आहे. या सामन्यामध्ये मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना विक्रमी 600 वा गोल केला. बार्सिलोनाकडून सहाशे गोल करणारा मेस्सी एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात बार्सिलोनाने लिव्हरपूलवर 3-0 अशा अंतराने विजय मिळवला. 
 
या सेमिफायनलमध्ये सुरुवातीपासून बार्सिलोनाने वर्चस्व राखले. बार्सिलोनाने सांघिक खेळ करत लिव्हरपूलवर दडपण आणले. ब्राझिलचा स्टार खेळाडू रॉबर्टो फर्मिनोच्या अनुपस्थितीमध्ये लिव्हरपूलने चांगला खेळ केला, परंतु पराभवापासून वाचवू शकले नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुआरेझने शानदार गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत बार्सिलोनाने ही आघाडी कायम राखली.मध्यांतरानंतर मेस्सीला पहिले यश 75 व्या मिनिटाला पहिले यश मिळाले. यानंतर सात मिनिटांनी पुन्हा एकदा मेस्सीने आपली जादू दाखवली आणि फ्री-किकवर ऐतिहासिक 600 वा गोल केला.