1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: तिरुवअनंतपूर , गुरूवार, 21 जून 2018 (11:12 IST)

मेस्सीसाठी भारतीय चाहत्याने केली 4 हजार किलोमीटर 'सायकलवारी'

lionel messi
अर्जेंटिनात्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याचा खेळ पाहण्यासाठी व त्याच्यासमवेत फोटो काढण्यासाठी भारताच्या चाहत्याने 4 हजार किलोमीटर सायकलने प्रवास करत रशिया गाठली आहे.
 
एखाद्या खेळाचे वेड काय असते याची प्रचिती पुन्हा एकदा या निमित्ताने आली. क्लिफन मूळचा केरळचा आहे. केरळमध्ये फुटबॉल चाहत्यांची संख्या खूपच जास्त आहे आणि फुबॉलच्या निस्सिम चाहत्यांपैकी क्लिफन फ्रान्सिसही एक आहे. येत्या काही दिवसांत तो मॉस्कोमध्ये सालकलने पोहोचणार आहे. फुटबॉलचे सामने आणि मेस्सीला याची देही याची डोळा पाहता यावे यासाठी हा सारा खटाटोप त्याने केला आहे.