बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (17:27 IST)

नॅशनल हॉकी कॅम्पसाठी 60 महिला खेळाडूंची निवड

हॉकी इंडिया (एचआय) ने बंगळुरुच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) सेन्टर येथे शुक्रवार पासून सुरू होणार्या राष्ट्रीय शिबिरासाठी गुरुवारी 60 वरिष्ठ महिला हॉकी खेळाडूंची नावे जाहीर केले.
 
एचआयने 9व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप (ए आणि बी विभाग) मध्ये खेळाडूंच्या प्रदर्शनावर आधारित राष्ट्रीय शिबिरासाठी त्यांची निवड केली आहे जे 26 एप्रिल ते 9 जून पर्यंत साई सेंटरमध्ये सराव करतील. 
 
आठ गोलकीपर्समध्ये सवितासह शिबिरात रजनी इतिमारपू, स्वाति, सोनल मिंज, बीचू देवी खारीबम, चंचल संध्या एमजी आणि महिमा यांना जागा मिळाली आहे. जेव्हा की डिफेंडरमध्ये दीप ग्रेस एका आणि सुशाली चानू सारखे मोठे नाव सामिल आहे. शिबिरासाठी 17 मिडफील्डर निवडल्या गेल्या आहे. यात निक्की प्रधान, लिलिमा मिन्झ, प्रीती दुबे आणि फॉरवर्डर्समध्ये रानी, नवजोत कोर, वंदना कटारिया, लालरेमसियामी सारखे खेळाडू राष्ट्रीय शिबिरात निवडले गेले आहे. 
 
4 मे रोजी सिलेक्टर्स निवड ट्रायलद्वारे 33 संभाव्यतांना निवडतील. मुख्य प्रशिक्षक शुअर्ड मरीने म्हणाले, आम्ही राष्ट्रीय शिबिरामध्ये नवीन आणि प्रतिभावान खेळाडूंच्या प्रदर्शनावर लक्ष ठेवू, पण त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. खेळाडूंच्या प्रदर्शनामध्ये आम्हाला सतत सुधारणा दिसत आहे जेथे युवा खेळाडू वरिष्ठ खेळाडूंना आव्हान करत आहे, त्यामुळे, कोर ग्रुपमधील स्पर्धा देखील वाढेल.