मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. विवाहानंतर सायनाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो सोबत सायनाने माझ्या जीवनातील सर्वोत्तम मॅच असे कॅप्शनही दिले आहे.
 
सायना नेहवाल आणि पी. कश्यप हे गेल्या 10 वर्षांपासून सोबत खेळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही 16 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा होती, परंतु दोन दिवस आधीच सायना आणि कश्यपने कोर्ट मॅरेज करत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला
 
सायनाने सांगितले होते की 2007-08 पासून आम्ही सोबत खेळत होतो, ट्रेनिंग घेत होतो. आजच्या काळात कोणाशी जवळीक साधणे कठिण आहे परंतू आम्ही अगदी सहज एकमेकाचे झालो.