कोरोना मृत्यूच्या बाबतीत ब्राझील सर्वात पुढे
जगभरात दररोज सुमारे एक लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, ब्राझीलसाठी कोरोना व्हायरस एक मोठे आव्हान बनले आहे. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासांत या विषाणूमुळे 1,473 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत येथे ३४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या बाबतीत ब्राझीलने आता इटलीला मागे टाकले आहे.
सुरुवातीला इटलीची परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली होती. पण सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.ब्राझीलमध्ये एकूण 34021 जणांचा मृत्यू तर इटलीमध्ये 33,689 लोकांचा मृत्यू झाला आहे. युनायटेड स्टेट्स अजूनही मृत्यूच्या बाबतीत पुढे आहे. येथे एक लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत, तर सुमारे चाळीस हजार लोकांचा मृत्यू झालेला यूके दुसर्या क्रमांकावर आहे.