मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , गुरूवार, 11 जून 2020 (14:21 IST)

चिनी असा उल्लेख केल्याने ज्वाला गुट्टा भडकली

भारताची स्टार बॅडटिंनपटू ज्वाला गुट्टा महिला चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार या सुरू झालेल्या मोहिमेदरम्यान एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर एका युजरने कमेंट करत तिला चिनी संबोधण्याचा  प्रयत्न केला. या प्रकरणाचा स्क्रीनशॉट तिने आपल्या टि्वटरवर शेअर केला. ही मोहीम नक्की कोणत्या  दिशेने जाते आहे ते पाहा, असे कॅप्शन लिहीत तिने आपला राग व्यक्त केला.