गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , बुधवार, 13 मे 2020 (17:53 IST)

सानिया मिर्झा ठरली पुरस्काराची मानकरी

sania mirza
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा फेड कप हार्ट पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आशिया गटात सानिया मिर्झाने 10 हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.

चाहत्यांनी केलल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानियाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी 60 टक्के मत सानियाला पडली आहेत. फेड कप हार्टपुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे. देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा माझा मानस असल्याचे सानियाने म्हटले आहे.