शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (15:19 IST)

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया विजयी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत दिल्याचे दिसून येत आहे. दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. 
 
तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण येथून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे मधल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडले होते. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतर पिछाडीवर असल्यामुळे जनतेचा या सीटकडे अधिक लक्ष होतं. तब्बल दोन हजार मतांनी मागे असलेल्या सिसोदिया यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पुन्हा आघाडी घेत विजय संपादन केला.
 
मनिष सिसोदिया यांनी 59,589 मतांनी पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवली आहे. त्यांच्या विरुद्ध भाजपहून रविंद्र सिंह नेगी यांना 57516 मत पडले. काँग्रेस उमेदवार 2332 मतांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिले.
 
मागील विधानसभा निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघातून मनिष सिसोदिया यांनी सुमारे 28000 मतांच्या अंतराने मानक विजयाची नोंद केली होती.