बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (16:26 IST)

भारतात ट्विटरवर #Undertaker हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळेच शनिवारी सकाळपासून भारतात ट्विटरवर #Undertaker हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्स #Undertaker पेक्षा दाऊद जास्तवेळा मेला असेल, असे सांगत या दाऊच्या निधनाच्या वृत्ताची खिल्ली उडवतान दिसत आहेत. 
 
दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचा खुलासा केला आहे. 'आयएनएस' वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दाऊदला कोरोनाची लागण झालेली नाही.