मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:13 IST)

येत्या 23 मार्चपासून अण्णा हजारे यांचे दिल्लीत आंदोलन

anna hajare andolan

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोर्चा उघडला आहे. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी मोदींनी कुठलीही ठोस पावलं उचलली नाहीत, असा आरोप अण्णांनी केला आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन छेडण्याची घोषणा अण्णांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अण्णांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात आपण मोदींना 30 पत्रं पाठवली. मात्र मोदींनी उत्तर दिलं नाही, याचाही दाखला अण्णांनी दिला.

मोदी सरकारने लोकपाल-लोकायुक्त कायदा कमकुवत केला. त्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही हा कायदा कुमकुवत केला, असा आरोप अण्णांनी केला.