बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (16:36 IST)

पुढच्या वर्षी 21 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

राज्य शासनाने 2019 च्या 21 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहे. सामान्य प्रशासन विभागाने  3 डिसेंबर रोजी तसे आदेश काढले असून येत्या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लक्ष्मीपूजन (दिवाळी) व इल-ए-मिलाद या तिन सुट्ट्या रविवारला आल्या आहे. तर उर्वरित 21 सुट्ट्यांपैकी रविवारला लागून सोमवारी महाशिवरात्र, बकरी ईद, गणेश चतुर्थी, बलिप्रदापदा (दिवाळी) या सुट्ट्या सोमवारला आल्या आहे. तर शनिवारला प्रजासत्ताक दिन, रामनवमी, बुद्ध पौर्णिमा, पारशी नववर्ष या सुट्ट्या आल्या आहे. तर भाऊबीज (दिवाळी) अतिरिक्त सुट्टी सुद्धा मंजूर केली आहे.