मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated :न्यूयॉर्क , सोमवार, 3 डिसेंबर 2018 (14:24 IST)

सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतली आहे. मुंबईत येऊन काही दिवसांसाठी विश्रांती घेऊन ती पुन्हा न्यूयॉर्कला उपचार घेण्यासाठी जाणार आहे, अशी माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून तिने शेअर केली होती.
 
काही महिन्यांपूर्वी सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तिला लगेच न्यूयॉर्कला उपचारासाठी हलवण्यात आले होते. सोनाली बेंद्रेला कर्करोग झाल्याच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. पण सगळ्यांना धैर्य बाळगण्याचे आवाहन तिने केले होते. त्यानंतर त्रास असह्य झाल्यावर तिने तिच्या मुलाला एक पत्रही लिहिले होते.
 
पण आता काही महिने कॅन्सरशी यशस्वीपणे झुंज देऊन ती त्यातून बर्‍यापैकी बाहेर पडली आहे. तेव्हा डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांतीसाठी घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे. या गोष्टीचा तिला प्रचंड आनंद झाला आहे. बरेच दिवस घर, मित्र आणि मुंबईपासून दूर असल्याने तिला या सगळ्यांची प्रचंड आठवण येत होती. तेव्हा मुंबईला येण्याचा आनंद तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून व्यक्त केला आहे. कधी-कधी आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. पण जशी आपल्या घरापासून आपली अंतरेवाढत जातात तसतसे आपले आपल्या घराशी नाते अधिक घट्ट होते जातात. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना हाच धडा मी शिकले आहे, अशा शब्दात तिने आपल्या भावना उलगडल्या आहेत.
यासोबत अजून लढाई संपली नसल्याची जाणीवही तिने व्यक्त केली आहे. आपल्या जवळच्या माणसांना भेटल्यामुळे ती अधिकच ताकदीने कॅन्सरचा प्रतिकार ती करू शकेल, असे तं तिने व्यक्त केले आहे.
 
सोनाली बेंद्रेच्या घरवापसीची सगळ्याच सिनेसृष्टीला उत्सु्रता लागली आहे.