संबंधित माहिती
- उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही, शिवसेनेने वृत्त फेटाळले
- उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? दीपाली सैय्यद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- 'एकनाथ शिंदे 2 दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार, भाजपने केली मदत', शिवसेना नेत्याचा मोठा दावा
- विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
- उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, महाराष्ट्र दौरा करणार
ठाकरेंना आणखी एक धक्का
बैठकीला शिवसेना खासदारांची उपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे आमदारांची बैठकी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार (Shivsena MP) हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आली आहे.
अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि ओमराजे निंबाळकर वगळता इतर 14 खासदार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.
