मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (13:00 IST)

50 हजारांसाठी काही पण !

गेल्या अडीच वर्षे कोरोनाने उच्छाद मांडला होता. कोरोनामुळे अनेक जण मृत्युमुखी झाले. अनेक घरे उध्वस्त झाले. मुले अनाथ झाले. कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार कडून 50 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केले होते. आणि त्या प्रमाणे मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना आवश्यक कागद पत्र देऊन अर्ज करायचा आहे. कागद पत्रांची पडताळणी केल्यावर त्यांना आर्थिक मदत राशी 50 हजार रुपये दिले जात आहे. 

मात्र आता नातेवाईकांना मिळणाऱ्या या मदत राशीला घेऊन नाते-संबंधामध्ये वाद होऊ लागला आहे. भाव-भावांमध्ये वाद होत आहे. तर बहीण देखील मिळणाऱ्या या पैशावर आपला हक्क सांगत आहे. 
 
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी मिळणाऱ्या पैशांसाठी एका पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. तर काही अर्ज बनावटी असल्याचे समजले. तर काहींनी पैशासाठी दोन जिल्ह्यातून अर्ज केला आहे. ऑनलाईन अर्ज करताना झालेल्या चुकीमुळे काही अर्ज बाद झाले आहे. मिळणाऱ्या या पैशांमुळे नात्यात दुरावा येत असल्याची माहिती मिळाली आहे. बनावटी अर्जाबाबत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. काही अर्ज एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी केले आहेत. काही दिवसांपूर्वी पैशांसाठी एकाच महिलेचे तीन पती असल्यामुळे पैशासाठी लोक काहीही करत आहे. या प्रकरणामुळे अर्जातील गोंधळ आणि बनावटी प्रकार समोर आला होता.