1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (10:17 IST)

आदित्य ठाकरे म्हणतात, 'योगी आदित्यनाथ लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार'

Aditya Thackeray says
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपले उमेदवार प्रचारात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गोरखपूर येथे सभा पार पडली.
 
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलीय.

ते म्हणाले, "उत्तर प्रदेशचा विकास केला असं सांगितलं जात होतं. पण, विकास झाला का? नाही झाला. इथले मुख्यमंत्री मुबंईत येतात तिथे जाहिरात देतात. इतके उद्योग आले. कारखाने आले. मग, इथे रोजगार वाढला का? नाही. उलट बेरोजगारी वाढलीय."

"महिला अत्याचार वाढलेत की महिला सन्मान वाढलाय? सामाजिक न्याय वाढलाय की सामाजिक अन्याय वाढलाय? आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.