शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:46 IST)

व्हिडीओ ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर निशाणा

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असून यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत आहेत. व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने उत्तर प्रदेशमधील जनतेला संबोधित करत आहेत.

यामध्ये धैर्यशील माने संबोधित करताना त्यांच्या बाजूला काही कार्यकर्ते आहेत. यामधील एकाने मास्क घातला आहे तर दुसऱ्याच्या हातात मास्क असून तो मास्क घालण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला कार्यकर्ता मास्क कानाला अडकवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही जमत नाही. साधारण व्हिडीओमध्ये कार्यकर्ता तब्बल २ मिनिट १२ सेकंद फक्त मास्क घालण्यासाठी घेत असल्याचे दिसत आहे. शेवटी कार्यकर्ता त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याबाबत विचारतो असे दिसत आहे. यानंतर तो बरोबर घालतो. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचा आता विरोधकांकडून वापर करण्यात येत असून मनसेनंही तोच व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. झुकेगा नही साला असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.